LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Sports News

*स्विमर्स क्लब बेळगावच्या वरिष्ठ जलतरणपटूंनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दाखवली जलकमाल*

स्विमर्स क्लब बेळगावच्या वरिष्ठ जलतरणपटूंनी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दाखवली जलकमाल

बेळगाव :
बेळगावच्या स्विमर्स क्लब आणि अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगाव या संस्थांचे वरिष्ठ जलतरणपटूंनी पुन्हा एकदा राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. गुजरातमधील वीर नर्मद साऊथ गुजरात विद्यापीठ, सुरत येथे ८ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या व्हेटरन्स स्पोर्ट्स अँड गेम्स नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये बेळगावच्या तीन जलतरणपटूंनी एकूण सहा पदके (३ सुवर्ण आणि ३ कांस्य) जिंकत प्रभावी कामगिरी केली.

या स्पर्धेत बेळगावच्या लक्ष्मण कुम्बार यांनी ५० मी. आणि १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात प्रत्येकी एक सुवर्ण पदक जिंकले, तर बलवंत पत्तर यांनी १०० मी. फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण आणि ५० मी. बटरफ्लाय तसेच १०० मी. बॅकस्ट्रोकमध्ये प्रत्येकी एक कांस्य पदक पटकावले.
एन. लोकप्पा यांनी ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

या सर्व जलतरणपटूंनी के.एल.ई. संस्थेच्या सुवर्ण जे.एन.एम.सी. जलतरण तलावात नियमित सराव करून ही कामगिरी साधली. त्यांना स्विम गुरू उमेश काळघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक अक्षय शेरगावकर, अजिंक्य मेंढके, नितीश कुदुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

स्विमर्स क्लब व अ‍ॅक्वेरियस स्विम क्लबच्या या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, के.एल.ई. सोसायटी), श्री. जयंत हुमबरवाडी (जयभारत फाऊंडेशन), रोटरीयन अविनाश पोटदार, सुलोचना मानेक कपाडिया, लता किट्टूर, सुधीर कुशाणे, प्रसाद तेंडोलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे क्लबच्या सूत्रांनी सांगितले.

या वरिष्ठ जलतरणपटूंनी दाखवलेली निष्ठा, शिस्त आणि खेळावरील अविरत प्रेम ही पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या जलकमालीने बेळगावच्या क्रीडा इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला आहे.

---

🏅 पदक यादी :

जलतरणपटू स्पर्धा प्रकार पदक

लक्ष्मण कुम्बार ५०मी. ब्रेस्टस्ट्रोक, १००मी. ब्रेस्टस्ट्रोक 🥇 सुवर्ण x 2
बलवंत पत्तर १००मी. फ्रीस्टाईल, ५०मी. बटरफ्लाय, १००मी. बॅकस्ट्रोक 🥇 सुवर्ण x 1, 🥉 कांस्य x 2
एन. लोकप्पा ५०मी. ब्रेस्टस्ट्रोक 🥉 कांस्य x 1

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*