Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*दीक्षांत समारंभात पीएचडी न मिळाल्याचा धक्का; संशोधक विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न*

बेळगाव :
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पीएचडी पदवी न मिळाल्याने मानसिक तणावात आलेल्या सुझाता बेंडी या संशोधक विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुजाता यांना तातडीने बेळगावातील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सूत्रांनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता बेंडी यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी रायबाग प्रदेशाच्या इतिहासावरील व्यापक संशोधन प्रबंध विद्यापीठात सादर केला होता. दीक्षांत सोहळ्यात पीएचडी पदवी प्राप्त होईल, अशी अपेक्षा होती. मात्र समारंभात त्यांचे नाव नसल्याचे दिसताच त्या तीव्र मानसिक तणावात गेल्या.

कुटुंबीय आणि सहशिक्षकांच्या म्हणण्यानुसार,
“विद्यापीठात जाणूनबुजून अडथळे निर्माण केले जात आहेत,”
असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सुजाता यांनी यापूर्वीही विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वर्तणुकीबद्दल कुलगुरू तसेच सचिवांकडे लिखित तक्रार केली होती. त्यावेळी हे प्रकरण "निवारण" करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा तिचे नाव अंतिम यादीत नसल्यामुळे तणाव वाढल्याचे जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू सी. एम. त्यागराज यांनी पीएचडी प्रदान करण्यास नकार दिल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर या घटनाक्रमाने संशोधन क्षेत्रातील विविध प्रक्रिया, पारदर्शकता आणि प्रशासनिक पद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दरम्यान, विद्यार्थिनीने अत्यंत तणावपूर्ण स्थितीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनानेही या घटनाक्रमाची वेगळी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*