LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*वैजनाथ मंदिरात कुद्रेमानी काँग्रेस कमिटीचा श्रावण महाप्रसाद*

कुद्रेमानी ( प्रतिनिधी ) दि 27 : श्रावणमासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून कुद्रेमानी काँग्रेस कमिटीच्या वतीने वैजनाथ मंदिर येथे गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा आणि गावातील बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमास २५० हून अधिक भाविक भक्तांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत महाप्रसादाचा भक्तिभावाने लाभ घेतला.

श्रावणातील पवित्र वातावरण, मंदिरातील भक्तीमय गजर आणि भाविकांची लगबग यामुळे वैजनाथ मंदिर परिसराला जणू भक्तीचे स्वरूप प्राप्त झाले होते. हनुमान हरिपाठ महिला मंडळाच्या वतीने हरिपाठाचे सादरीकरण करण्यात आले. हरिपाठाच्या मंगलमय स्वरांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी कुद्रेमानी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण देवण, दीपक पाटील, विनायक पाटील, रुक्माणा कागणकर, शंकर पाटील यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, । कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

महाप्रसादासाठी ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी  कृष्णा राजगोळकर , मारुती गोवेकर ,रवी पाटील, बाळाराम कदम, सुरेश पाटील, धोंडिबा पाटील, शिवाजी गुरव, नाना पाटील, बबन गुरव , हभप रामचंद्र रवळू पाटील ,शांताराम गुरव, राजू मराठे ,भरमाणा लोहार परशराम काकतकर, शंकर गो. पाटील, संभाजी निंगाप्पा पाटील , शामजी पाटील , बाळाराम गंगाजी पाटील, लक्ष्मण बडकू गुरव, रामलिंग पाटील ,लक्ष्मण राजगोळकर, नारायण गंगाजी पाटील ,रवळू देवण, परशराम तुर्केवाडीकर, रामलिंग पाटील, शशिकांत पाटील, निळकंठ साखरे, राजेंद्र निंगाप्पा पाटील, हणमंत पन्हाळकर, विमल साखर, रेखा गावडू पाटील, वैजू पन्हाळकर, मलाप्पा केसरकर, बाबू शंकर पाटील , पुंडलिक गुंडू पाटील ,संदिप राजगोळकर, मारुती मुरकुटे, शिवाजी पाऊसकर, निलेश संभाजी पाटील, निलेश शंकर पाटील, रोहन पाटील, रसुल मुल्ला ,विठ्ठल रामू पाटील, संजय देवण  जयवंत पाटील, जनार्दन लोहार, गावडू पन्हाळकर, मारुती काकतकर, गुरुनाथ देवण, प्रकाश गुंडू बिजगर्णीकर, हुवाप्पा पाटील, वामन कदम, जोतिबा धामणेकर , गोविंद कांबळे, लक्काप्पा कांबळे , सुरेश राजगोळकर, लक्ष्मण कांबळे, वामन कांबळे , यल्लापा नाईक, गोविंद तरवाळ, लक्ष्मण तरवाळ, वैजू गोपाळ तरवाळ, ईश्वर नाईक , सन्नाप्पा नाईक , यांच्यासह असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले.


महाप्रसादासाठी स्वादिष्ट व सुग्रास भोजन तयार करण्याची जबाबदारी रमेश देवण, काशिनाथ देवण ,शिवाजी राजगोळकर ,मारुती रेडेकर ,तुकाराम पाटील आणि परशराम कांबळे  यांनी सांभाळली. त्यांच्या परिश्रमातून तयार झालेल्या भोजनाचा भाविकांनी मनमुराद आस्वाद घेतला.

श्रावणमासातील या धार्मिक उपक्रमामुळे भक्तीबरोबरच सामाजिक सलोखा, सामुदायिक सहभाग आणि ग्रामएकतेचे दर्शन घडले. विविध स्तरांतील ग्रामस्थांनी व भाविकांनी एकत्र येत महाप्रसादाचा लाभ घेतल्याने गावातील बंधुभाव अधिक दृढ झाला.

श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या या श्रावण महाप्रसादाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*