LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*बेळगावात खमेनींचे बॅनर तात्काळ हटवण्याची श्रीराम सेनेची पोलिसांना मागणी*

बेळगाव : शहरातील काही भागात रमजान निमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे छायाचित्र असल्याचा आरोप करत श्रीराम सेनेने पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बेळगावातील गांधी नगर, देशपांडे गल्ली, खतलवाला दर्गा परिसर, कामत गल्ली, शहू नगर आणि कसाई गल्ली या भागांमध्ये संबंधित बॅनर लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या वतीने पोलिस प्रशासनाला या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या बॅनरमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

तक्रारीत संबंधित बॅनर तात्काळ काढून टाकावेत तसेच ते लावणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात उत्तर कर्नाटक राज्याध्यक्ष रविकुमार कोकित्तर आणि उपाध्यक्ष विनय अंगो यांनीही प्रशासनाला इशारा देत, योग्य वेळी कारवाई झाली नाही तर संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारू शकते, असे म्हटले आहे.

दरम्यान, परिस्थिती संवेदनशील असल्याने प्रशासनाने या प्रकरणाकडे लक्ष दिले असून पुढील कारवाईबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*