Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*“मनापासून राजीनामा देतोय”; सिद्दरामय्या यांच्या वक्तव्याने कर्नाटकात खळबळ*

बेंगळुरू
कर्नाटकाच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत असून मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत सरकारी निवास ‘कावेरी’ येथे उपहार बैठक घेतली. या बैठकीत सिद्दरामय्या यांनी “मला कोणतीही खंत नाही, मी मनापासून राजीनामा देत आहे,” असे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेस हायकमांड बैठकीत नेतृत्व बदलासंदर्भात चर्चा झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या सूचनेनंतर सिद्दरामय्या यांनी सत्तांतरास सहमती दर्शवली असल्याचे बोलले जात आहे.

बैठकीत सत्तेचे सुरळीत हस्तांतरण, पक्षातील एकजूट आणि पुढील नेतृत्वाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र पुढील मुख्यमंत्री कोण असणार याबाबत सिद्दरामय्या यांनी स्पष्ट नाव घेतले नाही. “हायकमांडच अंतिम निर्णय घेईल,” असे ते म्हणाले.

या बैठकीदरम्यान डीके शिवकुमार भावूक झाल्याची चर्चा असून सिद्दरामय्या यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या घडामोडींमुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल जवळपास निश्चित मानला जात असून पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*