LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*फोर्ट रोड ट्रॅफिकवर उपाय; पोलीस आयुक्तांची व्यापाऱ्यांसोबत बैठक*

बेळगाव शहरातील फोर्ट रोड परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त भुषण गुलाबराव बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, 7 मार्च 2026 रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत फोर्ट रोडवरील ऑटोमोबाईल डीलर्स तसेच विविध व्यावसायिकांनी सहभाग घेतला.

बैठकीदरम्यान पोलीस आयुक्तांनी व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधत वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, पार्किंगची समस्या तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.
या बैठकीस डीसीपी निरंजन देवराज उर्स, एसीपी निकम, उत्तर विभागाचे सीपीआय श्रीकांत तोटगी तसेच हेड कॉन्स्टेबल अब्दुल नायक उपस्थित होते.

बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने विविध समस्यांकडे लक्ष वेधले. विशेषतः चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या पार्किंगची अडचण, फोर्ट रोडवरील पाणी साचण्याची समस्या यावर त्यांनी सविस्तर मांडणी केली.

https://youtube.com/shorts/uskk0mmwcmU?si=m8agQ0McaKraiWux

तसेच शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारांचे त्यांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.
या बैठकीत सुहास पाटील (SP Car Accessories), हरीश मेहता (Jyoti Tyres), अमित दोशी (Fit My Tyre), कमरुद्दीन सौदागर (Bharat Automobile), राजन मोदी (Milan Automobiles), इनायत किलेदार, इक्बाल किट्टूर, बाबू, किरण, विशाल पाटील, श्याम धमणे यांसह अनेक व्यापारी उपस्थित होते.

बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाकडून सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*