LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात नाथपंथी रावळ समाजाचे रविवारी राज्यस्तरीय संमेलन*

बेळगाव - येथील नाथपंथी रावळ समाजाच्या वतीने रविवार दिनांक ५ जुलै रोजी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.नाथ पै चौक शहापूर खडेबाजार येथील श्री अंबाबाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील नाथपंथी रावळ समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 
हिंदू धर्मात मोक्षप्राप्तीचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या नवनाथांचे आगळे वेगळे महत्त्व विशद करण्यात आले आहे. नवनाथांच्या आचार विचार आणि विविध धार्मिक विधी विधानांचे अनुसरण करणारा रावळ समाज संपूर्ण देशभरात विखुरलेला आहे. नाथपंथी,रावळ,रावळभिल्ल,भिल्ल, हणगी,कपाली, शिवजोगी,बळेगार,बुवा, डवरी,जोगी इत्यादी अनेक जातीत समाज विखुरला गेला आहे. काळाच्या ओघात हा समाज सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्ट्या मागे राहिलेला आहे. हा समाज पारंपरिक व्यवसाय सांभाळत उदरनिर्वाह करत आहेत कर्नाटकामध्ये रावळ समाज मागासवर्गीय अल्पसंख्यांक मध्ये समाविष्ट आहे.सरकारी नोंदणी नुसार समाजाचा शैक्षणिक टक्का अवघा 0.5% इतका आहे. एकेकाळी अत्यंत बलशाली मानला गेलेला रावळ समाज जातीत विभागल्यामुळे अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.

विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या ध्येयाने बेळगावातील नाथपंथी रावळ समाजाने तीन राज्यांच्या रावळ समाजातील मान्यवरांचे संमेलन बेळगाव येथे रविवारी आयोजित केले आहे.शहापूर येथील नाथ पै चौक येथे असलेले प्राचीन श्री काळभैरवनाथ मंदिर नाथपंथी रावळ समाजाचे केंद्र स्थान आहे. या मंदिराची ख्याती बेळगाव पंचक्रोशीत पसरली आहे.

श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्ट वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी होणाऱ्या या संमेलनात समाजाच्या हिताच्या दृष्टीने ठराव केले जाणार आहेत. मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.या संमेलनाच्या तयारीसाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी जोरदार तयारी चालविली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*