Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? संघटनेविरोधात निवेदन*

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कर्मचारी संघटनेवर निष्क्रियतेचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात एका कर्मचाऱ्याने A. Amruthraj, अध्यक्ष – कर्नाटक राज्य महानगरपालिका कर्मचारी संघ, ग्रेटर बेंगळुरू प्राधिकरण कार्यालय, यांना महानगरपालिका कर्मचारी यल्लेश बच्चलपुरी निवेदन पाठवले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बेळगाव महानगरपालिका कर्मचारी कल्याण संघाने मागील जवळपास दहा वर्षांपासून सर्वसाधारण सभा घेतलेली नाही. तसेच कर्मचाऱ्यांकडून आलेल्या विविध अर्ज व तक्रारींवरही योग्य प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काही कर्मचारी शारीरिक आणि मानसिक तणावातून जात असताना देखील संघटनेने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पूर्वीच्या आयुक्तांविरोधात घडलेल्या वादाच्या वेळीही संघटनेने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय दरवर्षी सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सन्मानाने निरोप देण्याची परंपराही पाळली गेली नसल्याचे म्हटले आहे.

निवेदनात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, २०१७-१८ या आर्थिक वर्षात कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ३ कोटी ४० लाख रुपये नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्या सहकारी संस्थेत गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या काळात संबंधित संस्था तोट्यात असतानाही हा व्यवहार करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

इतक्या मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबतही कर्मचारी संघटनेने कोणतीही कारवाई किंवा चौकशीची मागणी केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य संघटनेच्या अध्यक्षांनी हस्तक्षेप करावा, तसेच बेळगाव महानगरपालिका कर्मचारी संघाची सर्वसाधारण सभा बोलवून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*