LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावातील आझाद नगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा कहर*

बेळगाव : शहरातील आझाद नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने दोन वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अहमद रमीज बिस्की (वय २ वर्षे) असे जखमी बालकाचे नाव आहे.

रविवारी दुपारी अहमद आपल्या घराजवळील गल्लीत खेळत असताना अचानक सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी बालकाला फरफटत नेऊन चावा घेतल्याने त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या.

घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन बालकाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर आझाद नगर परिसरात नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बेळगाव शहर व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, महापालिकेकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे अनेक भागांत लहान मुले, विद्यार्थी व महिलांसाठी घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, प्रशासनाकडून केवळ कागदी उपाययोजना होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या पार्श्वभूमीवर, महापालिका व प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा भविष्यात अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी जोरदार मागणी होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*