Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मोठ्या आवाजावर लगाम! बेळगाव प्रशासनाचा कडक निर्णय*

बेळगाव : शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर व सार्वजनिक शांततेवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, बेळगाव शहर व जिल्हा परिसरात उच्च डेसिबल डीजे, लाउडस्पीकर आणि इतर ध्वनीवर्धक उपकरणांच्या वापरावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

7 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 75 डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या डीजे सिस्टीम, बेस बूस्टर, मोबाईल डीजे वाहने यांचा वापर पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे. हा निर्णय ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियम) 2000 तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत घेण्यात आला आहे.

विशेषतः निवासी भाग, हॉस्पिटल, शाळा, न्यायालय आणि धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरातील ‘सायलेंट झोन’मध्ये तसेच वाहतूक दाट असलेल्या भागात डीजेचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही प्रकारच्या मोठ्या आवाजाच्या यंत्रणांना परवानगी नसणार आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विवाह समारंभ, मिरवणुका, शाळा-कॉलेज कार्यक्रम किंवा इतर सार्वजनिक-खाजगी कार्यक्रमांसाठीही हे नियम लागू राहतील. ध्वनीवर्धक वापरण्यापूर्वी पोलिस विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित डीजे उपकरणे आणि वाहने जप्त करण्यात येतील. तसेच वीजपुरवठा खंडित करून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कुठेही परवानगीपेक्षा जास्त आवाजाचा वापर होत असल्यास तात्काळ 112 किंवा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*