LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*लाखो सह्यांच्या’ मोहिमेला येळ्ळूर वासी याचा ठाम पाठिंबा*

बेळगाव

सीमाप्रश्न निकाली काढण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने सुरू केलेल्या ‘लाखो सह्यांच्या’ मोहिमेला आता लोकचळवळीचे रूप येत असून, या उपक्रमाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी येळ्ळूर विभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास घाडी होते.

बैठकीच्या प्रारंभी गावातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही संमत करण्यात आला.
सीमालढ्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावाने या प्रश्नावर नेहमीच आघाडी घेतली आहे. बैठकीत स्वाक्षरी मोहिमेचे स्वागत करताना, “हा केवळ पत्रकारांचा नव्हे, तर प्रत्येक सीमावासियाच्या अस्तित्वाचा लढा आहे. येळ्ळूर विभागातील प्रत्येक मराठी भाषिक या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवेल,” असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीस अध्यक्ष विलास घाडी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, मनोहर अ. पाटील, परशराम घाडी, शंकर टक्केकर, मल्लप्पा काकतिकर, तानाजी पाटील, महेश कुगजी, शुभम जाधव, आकाश नायकोजी, अमित मुचंडी, मदन धामणेकर, नागराज चांगळी, प्रसाद पाटील, भाऊराव मुंचंडीकर, योगेश कदम, अक्षय पाटील, राहुल कुगजी आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि मराठी भाषिकांची एकजूट दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. येळ्ळूर व परिसरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या सह्या गोळा करून मराठी जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*