Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*विषय: कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात*

       कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे जंगी स्वागत करण्यात आले.  

       कोणी पोलीस,कोणी सैनिक, डॉक्टर,शिक्षक त्याचबरोबर शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई यासारख्या विविध पारंपारिक वेशात इयत्ता पहिलीचे विद्यार्थी शाळेत अगदी उत्साहात उपस्थित होते. यावेळी शाळेचे ब्रँड अँबेसिडर संतोष दरेकर यांच्या वतीने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला सर्व विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिलचे वितरण करण्यात आले. यावेळी इतर वर्गातील विद्यार्थ्यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांचे वर्गात स्वागत केले.

              त्यानंतर पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थिनींच्या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित पाहुणे, पालक व विद्यार्थी यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी स्वागत केले. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल पालकांचे कौतुक व आभार व्यक्त केले.

       शाळेच्या पहिल्या दिवशीच महेश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.नवीन बॅग त्याचबरोबर पाटी पेन्सिल,नवीन वातावरण,वर्ग सजावट हे सर्व पाहून इयत्ता पहिलीचे चिमुरडे भारावून गेले.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला. विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खास बाहुले शाळेमध्ये आणण्यात आले होते. 

मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी  “पहिलीचा हा पहिला दिवस मुलांसाठी खूप खास असतो. शाळा हे मुलांचे दुसरे घर आहे, आणि इथे त्यांना दर्जेदार मातृभाषेतून शिक्षणा बरोबर आनंदही मिळेल याची आम्ही काळजी घेऊ.”अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन उदय पाटील यांनी केले.
शालेय प्रारंभोत्सवामुळे नवीन विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस सुखद आणि विस्मरणीय झाला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*