Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी*

महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी; दोन दिवसांत तारीख निश्चित होण्याची शक्यता

बेळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ काळापासून रखडलेली सुनावणी आता लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. 16 फेब्रुवारी 2026 पासून सर्वोच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठ उपलब्ध होणार असल्याने, या महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सीमावादाच्या सुनावणीला सातत्याने विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून प्रकरण तातडीने सुनावणीस घ्यावे, अशी विनंती केली होती. त्या अर्जावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने 21 जानेवारी 2026 रोजी मूळ याचिकेनुसार सुनावणी घेतली जाईल, असे स्पष्ट केले होते.

महाराष्ट्र सरकारने त्या अनुषंगाने सुनावणीची तयारीही पूर्ण केली होती. मात्र, नियोजित दिवशी सर्वोच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठ उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे सीमावादाच्या प्रकरणाला पुन्हा विलंब सहन करावा लागला.

या पार्श्वभूमीवर, न्यायालयात आवश्यक खंडपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा अर्ज सादर करावा, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सातत्याने कायदेशीर सल्लामसलत आणि वकिलांशी चर्चा सुरू होती.

आता 16 फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठ उपलब्ध होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली असून, त्यामुळे महाराष्ट्र–कर्नाटक सीमावादावरील सुनावणी लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. न्यायालयाकडून येत्या दोन दिवसांत सुनावणीची तारीख निश्चित केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*