Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव दडपशाहीविरोधात युवासैनिकांचा संताप उसळला*

बेळगाव : बेळगाव आणि सीमाभागातील मराठी कार्यकर्त्यांवर कर्नाटक प्रशासनाने केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासैनिकांच्या प्रतिनिधीमंडळाने आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

८ डिसेंबर २०२५ रोजी बेळगावमध्ये शांततेने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यास परवानगी नाकारण्यात आली आणि मराठी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. या दडपशाहीचा निषेध करत युवासैनिकांनी कर्नाटक प्रशासनाच्या “लोकशाहीविरोधी आणि मराठीविरोधी” कारवाईविरोधात कठोर भूमिका मांडली.

प्रतिनिधींनी सांगितले की, “सीमाभागातील मराठी जनतेने अनेक दशकांपासून महाराष्ट्रात विलिनीकरणाची संविधानिक मागणी ठेवली आहे. तरीही न्यायालयात विषय प्रलंबित असताना बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामांतर आणि विधानसौधात अधिवेशन भरवून कर्नाटक सरकार मुद्दामहून मराठी भावनांना धक्का देते.”

महामेळाव्यास नकार देऊन तसेच उपस्थित मराठी कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून ताब्यात घेण्याचा प्रकार “अत्यंत संतापजनक व लोकशाहीला काळिमे फासणारा” असल्याचे युवासैनिकांनी निवेदनात नमूद केले.

तसेच, “सीमाभागातील न्याय्य लढ्याला पक्ष संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत नेहमीच खंबीर पाठिंबा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई असो वा रस्त्यावरचा संघर्ष — शिवसेना मराठी बांधवांसोबत ठामपणे उभी राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या शिष्टमंडळात विनायक हूलजी, सोमनाथ सावंत, वैभव कामत, मल्हारी पावसे, अद्वैत माने, जय पावशे, सक्षम कंग्राळकर आणि विनायक पाटील यांचा समावेश होता.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*