LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*भाषिक अल्पसंख्याकांच्या अहवालाबाबत केंद्राचे जिल्हा प्रशासनाला निर्देश*

बेळगाव :
केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या हिताच्या उपाययोजनांबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

३० सप्टेंबर २०२५ रोजी आयोगाचे उपायुक्त एस. शिवकुमार यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना पत्र पाठवून संबंधित अहवाल तातडीने सादर करण्याची विनंती केली आहे.

या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या भाषिक अल्पसंख्याक सहाय्य आयुक्त कार्यालयाकडून फेब्रुवारी १८ आणि १९, २०२५ रोजी बेळगाव जिल्ह्याला अधिकृत भेट देण्यात आली होती. त्या भेटीदरम्यान प्रशासनाने अल्पसंख्याकांच्या भाषिक अधिकारांबाबत कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती देणारा ‘ऍक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप प्राप्त झालेला नाही.

आयोगाने याआधी १४ मार्च, ३० जून आणि २५ जुलै २०२५ रोजीही या संदर्भात पत्रव्यवहार केला असल्याचे नमूद केले आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून अद्याप अहवाल न आल्याने, तो तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या अहवालात बेळगाव जिल्ह्यातील भाषिक अल्पसंख्याकांसाठी राबविलेल्या योजनांचा तपशील, त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती आणि संरक्षणात्मक उपाययोजना यांचा समावेश असणार आहे. प्राप्त माहितीच्या आधारे आयोग पुढील कार्यवाही करणार आहे.

सदर पत्राची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आग्रही, आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती या तिन्ही संघटनांच्या अध्यक्षांनाही पाठविण्यात आली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*