Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीला प्रारंभ; कटबंध वाराची सुरुवात*

कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेच्या पूर्वतयारीला प्रारंभ; कटबंध वाराची सुरुवात

कंग्राळी बुद्रुक (ता. बेळगाव) येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रेची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे. 28 एप्रिल 2026 रोजी पारंपरिक वैभवात होणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने 16 सप्टेंबर 2025 रोजी पहिला कटबंध वार पाळण्यात आला.

सकाळी देवीची पूजाअर्चा आणि गदगेवरील पावलांचे पूजन करून धार्मिक विधी पार पडले. पहिल्या वारानिमित्त गावातील सर्व व्यवहार, शेतकाम, दुकाने, गिरण्या, लोहारकाम तसेच शाळा बंद ठेवण्यात आल्या. गावकऱ्यांनी ठरलेल्या परंपरेनुसार घरात भाकरी न करण्याचा संकल्प पाळला. विशेष म्हणजे या दिवशी गावातील कोणालाही बाहेर जाण्यास तसेच बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यास परंपरेनुसार मनाई करण्यात आली.

एकूण पाच वार पाळण्यात येणार असून त्यातील पहिला वार मंगळवार, 16 सप्टेंबरला झाला. उर्वरित वार खालीलप्रमाणे साजरे होणार आहेत:

दुसरा वार : शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025

तिसरा वार : मंगळवार, 23 सप्टेंबर 2025

चौथा वार : गुरुवार, 25 सप्टेंबर 2025

पाचवा वार : मंगळवार, 30 सप्टेंबर 2025

यावेळी महालक्ष्मी यात्रा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि एकात्मतेचे प्रतीक असलेली ही परंपरा यात्रेच्या यशस्वी आयोजनाची पायाभरणी ठरत आहे.

https://youtube.com/shorts/wGErx4o9Bsk?si=Ei0edsg2N3_qojPA

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*