Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*तीन तरुणांचा गुदमरून मृत्यू, एक अत्यवस्थ*

बेळगावात थंडीपासून बचावासाठी कोळशाची शेगडी पेटवली; धुराने तिघा तरुणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

बेळगाव: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळशाची शेगडी खोलीत पेटवून झोपलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. बेळगावातील अमन नगर भागात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत झालेल्या तरुणांची नावे रिहान मट्टे (22), मोईन नालबंद (23) आणि सर्फराज हरपनहळी (22) अशी आहेत. तर शहानवाज (19) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चारही मित्र एका भाड्याच्या खोलीत राहत होते. बेळगावात वाढलेल्या थंडीमुळे त्यांनी रात्री कोळशाची शेगडी पेटवून खोलीतच ठेवली. मात्र खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद असल्याने शेकोटीचा धूर खोलीत साचून राहिला. धुराचा प्रभाव वाढत जाऊन तिघांचे झोपेतच गुदमरून निधन झाले, तर एक तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडला.

घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. माळमारुती पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. अमन नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती आमदार असिफ राजू शेठ व युवा नेते अमन सेठ यांना समजताच घटनास्थळी त्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

या घटनेमुळे थंडीच्या दिवसात कोळशाच्या शेगड्यांमुळे होणाऱ्या धोकाबाबत पुन्हा एकदा जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*