Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*चैत्र पौर्णिमेला पारंपरिक सासनकाठी यात्रा; कपिलेश्वर मंदिराची सेवा*

बेळगाव : चैत्र पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सासनकाठी यात्रेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली, नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान तसेच कोंडुस्कोप परिसरातून बैलगाड्या आणि सासनकाठी घेऊन भाविक पारंपरिक पद्धतीने पायी कोल्हापूरकडे प्रस्थान करत आहेत.

या यात्रेत सहभागी होणाऱ्या बैलजोड्यांसाठी विशेष पौष्टिक आहाराची व्यवस्था करण्यात आली. तसेच पायी चालणाऱ्या भाविकांना शिधा स्वरूपात आवश्यक वस्तूंचे वितरण करून मंदिर प्रशासनाने सेवाभाव जपला.

यात्रेच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. येथे विधीपूर्वक पूजा आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे भक्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्यासह अभिजीत चव्हाण, अजित जाधव, प्रसाद बाचुळकर, राजू भातकांडे, तानाजी मुतकेकर, अभय लगाडे, ज्योतिबा कावळे, प्रथमेश कावळे, रणजीत जाधव, सचिन सत्तेगिरी, आनंद बाळेकुंद्री, मदन मनगुतकर, अनिल पावशे, दौलत जाधव, संतोष हजारी, पवन मन्नुरकर, अभी पवार, निसर्ग चव्हाण, रोशन नाईक यांच्यासह महिला सेवेकरी व ट्रस्टी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*