LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट — फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा अनोखा उपक्रम*

 स्वातंत्र्यदिनाचा उत्सव देशभरात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमने हा दिवस एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. जंगलभागात वसलेल्या वीस एक घरे असणाऱ्या स्वप्नवेल /तिलारी परिसरातील घनदाट जंगल आणि निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या सरकारी मराठी लोअर प्राथमिक मराठी शाळा, धनगरवाडी, धामणे (एस )  येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

         प्रचंड जंगल, सतत धो धो कोसळणारा पाऊस,आजूबाजूला तर कधी कधी चक्क गावात असणारा जंगली स्वापदांचा वावर, रस्त्यांचा पत्ता नाही, तरीही एका छोट्याश्या पत्र्याच्या खोलीत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण घेणारी अकरा मुले व पाचवी नंतर याच जंगलातून वाट काढत रोज आठ किलोमीटर पायी चालत ये जां करणारी दहा एक मुलं मुली.अशी ही या वाडीतील शिक्षण घेणाऱ्या मुलांची व्यथा.

          तरीही या परिस्थितीशी झगडत, तिच्याशी सांगड घालत, परिस्थितीशी जुळवून घेत, आनंदाने शिक्षण घेणारी ही मुले भविष्याची स्वप्ने पहात परिस्थितीशी दोन हात करत आहेत.या परिस्थितीची कल्पना शाळेचे मुख्याध्यापक बी. डी. सावंत, कुद्रेमनी मराठी शाळेचे मुख्याध्यापक केदारी गुंजीकर यांनी फेसबुक फ्रेंड सर्कलला दिली.याची नोंद घेत तत्परतेने फेसबुक फ्रेंड सर्कलने विविध साहित्याची जुळवाजवळ केली.

जंगलभाग, खराब रस्ता त्यातच धो धो पडणारा पाऊस असं असूनही शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचत शाळा व विद्यार्थ्यांसाठी विविध उपयुक्त साहित्याचे वितरण केले.यामध्ये २० लिटर इंटिरियर पेंट, टी-शर्ट्स, ट्रॅक सूट्स, ट्रॅक पँट्स, रेनकोट्स, सँडल्स, शैक्षणिक साहित्याचे किट्स, १०० ग्रंथालयीन पुस्तके, ग्रंथालयासाठी ट्रंक, फ्लोअर कार्पेट्स, जेवणासाठी कार्पेट्स आणि मुलांसाठी मिठाई यांचा समावेश होता.

        हे शैक्षणिक साहित्य पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.या उपक्रमातून शिक्षण, वाचन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.

       या उपक्रमासाठी लोटस हॉस्पिटल बेळगावचे प्रमुख डॉ.अनिल पाटील, लोकमान्य ग्रंथालय,लोकमान्य बाल ग्रंथालय,एक्स्पर्ट व्हॉल्वस आणि इकविपमेंट्स, प्रकाश भजंत्री, हरीश तेरगावकर, अजित कुलकर्णी, कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, दिनेश कोल्हापुरे, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या सहकार्याने या शाळेतील विद्यार्थ्यां पर्यंत मदत पोचवण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*