LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*सुळगा (हिं.) येथे वारकरी दिंडीचे उत्साहात स्वागत; सेवाभावाचा आदर्श कायम*

आषाढी वारीनिमित्त गोव्यातील उस्ते-सत्तरी (वाळपई) येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या दिंडीचे सुळगा (हिं.) येथे बुधवारी भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून दिवंगत सामाजिक कार्यकर्ते स्व. शट्टूप्पा (बाळू) पाटील यांनी सुरू केलेली सेवाभावाची परंपरा त्यांच्या कुटुंबीयांनी सलग पाचव्या वर्षीही जपली.

बेळगाव–वेंगुर्ला मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या स्वागत सोहळ्यास रोहन पाटील, माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सर्व वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. पावसाने विश्रांती दिल्याने वारकऱ्यांनी आनंदाने या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी वारकरी विद्येश माडकर यांनी दिंडीची माहिती देताना सांगितले की, उस्ते येथून खांद्यावर पालखी घेऊन पंढरपूरपर्यंत पायी जाण्याची ही मंडळाची सलग पाचवी वारी असून यंदा १५३ वारकरी सहभागी झाले आहेत. दिंडीचे प्रमुख बारकेलो राणे (बुवा), उपप्रमुख सर्वेश राणे, संचालक रामकृष्ण इब्रामपूरकर आणि सचिव मोहन वांतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

सुळगा ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रास्ताविकात शेखर मनोहर पाटील यांनी स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत, "वारकऱ्यांची सेवा म्हणजे ईश्वरसेवा" या भावनेतून त्यांनी सुरू केलेला उपक्रम आजही त्यांच्या कुटुंबीयांकडून तितक्याच श्रद्धेने पुढे नेला जात असल्याचे सांगितले.

माधुरी जाधव यांनी मनोगतात स्व. शट्टूप्पा पाटील यांनी दिलेले सेवाभावाचे संस्कार भविष्यातही जपण्याचा निर्धार व्यक्त केला. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून ही परंपरा अखंड सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सुळगा ग्रामस्थांसह अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी भरत पाटील यांनी वारकरी परंपरेतील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित करत दिंडीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
दरवर्षीप्रमाणे केलेल्या स्वागत व सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिंडीच्या वतीने रोहन पाटील, माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*