Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*"वीर राणी चन्नम्मा उत्सवाला कित्तूरमध्ये थाटात प्रारंभ"*

भारतात इंग्रजांच्या विरुद्ध सर्वप्रथम लढा देऊन विजय मिळवणाऱ्या वीर राणी कित्तूर चन्नम्माच्या कित्तूर उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. राणी कित्तूर चन्नमाने इंग्रजावर विजय मिळवून एकशे दोन वर्षे पूर्ण झाली, त्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी कित्तूर उत्सवाचे आयोजन करण्यात येते.

राज्यातील विविध ठिकाणाहून आलेली कला पथके शोभयात्रेचे आकर्षण ठरली.
कर्नाटकात फिरून आलेल्या वीर ज्योतीचे बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वागत केले. त्यानंतर कित्तूर संस्थानच्या ध्वजाचे ध्वजारोहण महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शोभयात्रेला प्रारंभ करण्यात आला. शेकडो सुहासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन शोभयात्रेत सहभागी झाल्या होत्या.

यक्षगान कलाकारांनी वाद्याच्या तालावर नृत्य करून उपस्थितांची वाहवा मिळवली. वीर राणी कित्तूर चन्नमाच्या वेषात घोड्यावर स्वार झालेल्या मुलीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्रिशूल नृत्य करणाऱ्या महिला कलाकाराने देखील साऱ्यांची मने जिंकली. नृसिंह आणि वराह अवतार धारण केलेले कलाकार देखील लोकांचे आकर्षण ठरले होते. चित्रविचित्र मुखवटे परिधान करून अनेक कलाकार शोभयात्रेत सहभागी झाले होते. विदुषकांनी देखील नृत्य करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

हातात भली मोठी गदा घेतलेला हनुमान लहानांच्या बरोबरच थोरांचेही लक्ष वेधून घेत होता. संबळच्या तालावर हातात तलवार घेऊन नृत्य करणाऱ्या कलाकारानी देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने वस्तू प्रदर्शन, फळे पुष्प प्रदर्शन, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*