Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*“आमच्या कुटुंबाचं काय?” — L&T निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप*

बेळगांव:महानगरपालिकेतून एल अँड टीकडे वर्ग करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक देण्यात आलेल्या नोटिशीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात असून वेतनासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत कंपनीकडून ३१ मेपर्यंतच सेवा सुरू राहतील, असा तातडीचा आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही कर्मचारी तब्बल २८ वर्षांपासून काम करत असल्याने अचानक आलेला हा निर्णय त्यांच्या दृष्टीने धक्कादायक मानला जात आहे.

सध्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या तातडीच्या धोक्यात आल्या असून जवळपास ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अनिश्चित बनले आहे. सुरुवातीला या प्रकल्पांतर्गत ३७५ पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. कालांतराने काहींचे निधन झाले, तर काही कर्मचारी वयोमर्यादा ओलांडल्याने सेवेतून बाहेर पडले. आता जवळपास ३०० कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नियमांनुसार प्रकल्प संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा महानगरपालिकेकडे वर्ग करणे अपेक्षित होते. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे अनेक कुटुंबांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पालकांच्या औषधोपचारांचा खर्च, मुलांचे शिक्षण, घरभाडे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा, याबाबत कर्मचारी चिंतेत आहेत.

दरम्यान, काही नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. विशेषतः काही अधिकारी वर्गातील नातेवाईक आणि राजकीय शिफारशीवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याचा आरोप होत असून यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रभावित कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुढील आंदोलन आणि भूमिका ठरवण्यासाठी कर्मचारी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी दलीत नेते मल्लेश चौगुले,सुब्रमण्यम (सुबू) कांबळे, संदीप कोलकर यांच्यासहित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*