LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*येळळूर- वडगाव रोडवर कचराच कचरा नागरिकांच्या आरोग्याला धोका*

बेळगाव:
येळळूर- वडगाव मेन रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून येत आहेत. या कचऱ्याची वेळेवर उचल होत नसल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
या परिसरामध्ये केएलइ हॉस्पिटल त्याचबरोबर नागरी वसाहती देखील आहेत. त्यामुळे या कचऱ्याचा येथील नागरिकांना त्याचप्रमाणे हॉस्पिटलला येणाऱ्या नागरिकांना देखील त्रास होत आहे. या भागामध्ये बेवारस कुत्र्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणावर आहे. ही कुत्री हा कचरा ओढून रस्त्यावर आणून टाकत आहेत. या कुत्र्यांना हटकल्यानंतर ती संबंधित व्यक्तींच्या अंगावर धावून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच नागरिकांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. तेव्हा येथे कचरा टाकणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वडगाव येथील अष्टविनायक नगर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज पुरवठा करणाऱ्या खांबाखाली काही नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत होता. त्यामुळे येथे देखील दुर्गंधी सुटली होती. त्याचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी या परिसरातील स्वच्छता करून येथे कचरा टाकणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल असा फलक देखील लावला आहे. येथे कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

https://youtube.com/shorts/5YgZm8AYbbE?si=1ZLeA1dTQsDHwrGu
येथील कचऱ्याबाबत नागरिकांकडून तसेच प्रसारमाध्यमांकडून वेळोवेळी आवाज उठवण्यात आलेला आहे. मात्र याबाबत संबंधित खात्याकडून म्हणावी तशी कारवाई करण्यात आलेली नाही.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*