LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Health & Fitness

*बेळगावात पहिली ब्लेडलेस रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी; Z8 तंत्रज्ञानामुळे नेत्रचिकित्सेत नवे पर्व*

बेळगाव, १२ फेब्रुवारी २०२६:

बेळगाव शहराने नेत्रचिकित्सा क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून एमएम जोशी–कोडकणी सुपरस्पेशालिटी आय सेंटरमध्ये Z8 झीमर तंत्रज्ञानाद्वारे पहिली ब्लेडलेस रोबोटिक कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. यासोबतच क्लिअर लेसिक (Corneal Lenticule Extraction) प्रक्रियेद्वारे चष्म्याचा क्रमांक कायमचा दूर करण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.

फेम्टोसेकंद लेसर आधारित ही आधुनिक पद्धत पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद पुनर्प्राप्ती देणारी मानली जाते. या प्रक्रियेमुळे मोतीबिंदू उपचार, रिफ्रॅक्टिव्ह करेक्शन (चष्मा क्रमांक कमी करणे) तसेच काही कॉर्नियल शस्त्रक्रिया एकाच अत्याधुनिक प्रणालीद्वारे शक्य होत आहेत.

डॉ. शिल्पा कोडकणी आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने या प्रगत शस्त्रक्रिया पार पाडत उत्तर कर्नाटकातील रुग्णांसाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिले आहे.

गेल्या सहा दशकांपासून नेत्ररोग उपचारात आघाडीवर असलेल्या एमएम जोशी आय इन्स्टिट्यूटने अत्याधुनिक तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचे ध्येय कायम राखले आहे. Z8 तंत्रज्ञानाची सुविधा आता उत्तर कर्नाटकातील संस्थेच्या सर्व केंद्रांवर उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

नेत्रचिकित्सेत रोबोटिक अचूकतेकडे टाकलेले हे पाऊल बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*