Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*६७ वर्षीय रुग्णावर यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट*

बेळगाव : शहरातील केएलई सेंच्युरी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये ६७ वर्षीय रुग्णावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली असून, या कामगिरीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश नोंदवले गेले आहे.

या संदर्भात माहिती देताना केएलई संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, संबंधित रुग्णाला डायबेटिक किडनी डिसीजमुळे मूत्रपिंड निकामी होण्याच्या अंतिम टप्प्याला पोहोचले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर असताना रुग्णाच्या ४७ वर्षीय मुलीने पुढाकार घेत किडनी दान केली. जिवंत नातेवाईकांकडून अवयवदानाचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. बी. नेर्ली यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. नेफ्रॉलॉजी विभागातून डॉ. अंजनेय यादवूर यांनी उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच अ‍ॅनेस्थेशिया तज्ञ डॉ. सुरेश एस.एन. आणि डॉ. निलेवेगी यांच्या टीमनेही शस्त्रक्रियेला यशस्वी बनवण्यात मोलाचे योगदान दिले.

https://youtu.be/38X44TxTPM0?si=3FQzcLgeADQ9aeio

या यशस्वी प्रत्यारोपणामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला नवजीवन लाभले आहे. केएलई रुग्णालयाच्या तज्ज्ञ वैद्यकीय सेवांची ही आणखी एक उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*