LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*भारत विकास परिषदेची २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा*

भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा. संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. हिंदी देशभक्तीगीत आणि लोकगीत (मराठी/कन्नड) अशा दोन विभागात स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेमध्ये अधिकाधिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन भाविपने केले आहे.

       हिंदी विभागातील विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख ५,००० रूपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक रोख ३,००० रूपये आणि तृतीय क्रमांक रोख २,००० रूपये तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी १,००० रूपये रोख देण्यात येतील. लोकगीत स्पर्धेसाठी आकर्षक स्मृतिचिन्हे देण्यात येतील. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

      स्पर्धेत ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी भाग घेऊ शकतील. समूहात कमीतकमी ६ आणि जास्तीतजास्त ८ विद्यार्थी असावेत. वाद्य संगतीकरिता अधिक ३ सहकाऱ्यांना मुभा असेल. विद्युत संचलित वाद्यांना परवानगी नाही. समूहगायनासाठी अधिकतम ७ मिनिटांचा कालावधी असेल. परिषदेतर्फे प्रकाशित 'चेतना के स्वर' या पुस्तकातीलच हिंदी गीत असले पाहिजे. लोकगीत कोणतेही चालेल. संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे.

संगीतरचना, शब्दोच्चार, स्वर, ताल आणि एकूण प्रभाव अशी गुणांची विभागणी असेल. प्रथम क्रमांक प्राप्त शाळासमूह प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. प्रांतविजेता दक्षिण भारत विभागीय स्तर आणि विभागीय स्तर विजेता राष्ट्रीय पातळीवर समूह गायन स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करेल.

     अधिक माहितीसाठी ८७९२२५८४७७ अथवा ७०१९७२४२४८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे भाविपचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी कळविले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*