LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

भारतीय नौदलात ‘आयएनएस मालवण’चा समावेश; सागरी सुरक्षेला मिळाले नवे बळ

भारतीय नौदलात ‘आयएनएस मालवण’चा समावेश; सागरी सुरक्षेला मिळाले नवे बळ
कारवार | डी मीडिया
भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात महत्त्वाची भर घालत ‘आयएनएस मालवण’ या अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा कर्नाटकातील कारवार नौदल तळावर अधिकृतपणे ताफ्यात समावेश करण्यात आला. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाअंतर्गत विकसित करण्यात आलेली ही माहे श्रेणीतील दुसरी पाणबुडीविरोधी युद्धनौका असून, तिच्या निर्मितीत 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये बांधण्यात आलेली ही युद्धनौका विशेषतः उथळ किनारी समुद्री भागात शत्रूच्या पाणबुड्या, अंडरवॉटर ड्रोन आणि सागरी घुसखोरांचा शोध घेऊन प्रभावी कारवाई करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोनार प्रणाली, लाइटवेट टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर यांसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी ती सुसज्ज आहे.
सुमारे 80 मीटर लांबी आणि 1,100 टन विस्थापन क्षमता असलेल्या या युद्धनौकेत अत्याधुनिक वॉटर-जेट प्रोपल्शन प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे उथळ पाण्यातही ती वेगवान आणि प्रभावीपणे कार्य करू शकते. तिचा कमाल वेग 25 नॉट्स (सुमारे 46 किमी प्रतितास) इतका आहे.
या युद्धनौकेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक किनारी शहर ‘मालवण’ याचे नाव देण्यात आले असून, तिच्या प्रतीकचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा असलेले ‘वाघनख’ समाविष्ट करण्यात आले आहे. शत्रूच्या हालचालींवर अचूक नजर ठेवून प्रभावी हल्ला करण्याच्या क्षमतेमुळे संरक्षण क्षेत्रात या युद्धनौकेला ‘समुद्रातील सायलेंट किलर’ म्हणूनही ओळखले जात आहे.
या कमिशनिंग सोहळ्यास भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन, कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, नौदलातील वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*