मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे इन्फंट्री डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला लष्कराचे अधिकारी, जवान आणि सेवानिवृत्त अधिकारी देखील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरानी शरकत वॉर मेमोरियलला पुष्प पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी सैन्य दलातर्फे इन्फंट्री डे चे आयोजन करण्यात येते. मातृभूमीचे रक्षण करत असताना शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी आणि जूनियर लीडर लीडर्स विंगचे कमांडंट मेजर जनरल राकेश मनोच्या यांनी शरकत वार मेमोरियल येथे पुष्पचक्र अर्पण करून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली.उपस्थित सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. इन्फंट्री डे कार्यक्रमाला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी अधिकारी, जवान आणि सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.
Also read









