Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रकरणात पुन्हा हलचल*

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रकरणात पुन्हा हलचल; सर्वोच्च न्यायालयात २१ जानेवारीला सुनावणी निश्चित

बेळगाव :
दशकानुदशके प्रलंबित असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न प्रकरणात नव्या घडामोडी घडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दीर्घकाळ रेंगाळलेल्या विवादाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

महाराष्ट्र सरकारतर्फे अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात हा दावा मेन्शन केला होता. सोमवारी ही याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध असली तरी क्रमांक ८०१ वर असल्याने ती त्या दिवशी पटलावर आली नाही. मात्र, न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख निश्चित करत महाराष्ट्राच्या विनंतीस मान्यता दिली.

सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील वैद्यनाथन आणि अॅडव्होकेट शिवाजी जाधव यांनी खटला तातडीने ऐकून घ्यावा अशी मागणी केली. त्यावर न्यायमूर्ती संजीव कुमार यांनी ती मान्य करत सुनावणीची तारीख २१ जानेवारी निश्चित केली. त्या दिवशी मूळ दाव्यावरील प्राथमिक सुनावणी होणार असल्याचे समजते.

या प्रकरणाची मागील सुनावणी २०२३ मध्ये झाली होती. परंतु त्यावेळी खंडपीठात कर्नाटकातील न्यायमूर्तींचा समावेश असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता नव्या वर्षी होणारी ही सुनावणी सीमावादाच्या दिशेने काही ठोस निर्णय घेईल का, याकडे महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांतील जनतेचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा अधिक बळकट करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची कायदा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आगामी सुनावणीत राज्य सरकार आक्रमक भूमिकेत दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*