LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*

हैदराबाद : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. तेलंगणातील विविध विकास प्रकल्पांच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या आयातीचा मुद्दा उपस्थित केला.

देशाला आवश्यक असलेले बहुतांश इंधन आयात करावे लागते. त्यामुळे परकीय चलनावर मोठा ताण येत असल्याचे सांगत मोदी यांनी नागरिकांनी शक्य तितका इंधन वापर कमी करावा, असे म्हटले. यावेळी त्यांनी कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले.

मोदी यांनी खासगी वाहनांचा वापर मर्यादित ठेवण्याचा सल्ला देत, मेट्रो सेवा उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे असे सांगितले. कारपूलिंगचा वापर वाढवण्याबरोबरच इलेक्ट्रिक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्याचेही त्यांनी आवाहन केले.

त्याचबरोबर परकीय चलनाची बचत करण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक परदेश प्रवास टाळावा, सुट्ट्यांसाठी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्यावे आणि पुढील काही काळ सोन्याची खरेदी टाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला. सोन्याच्या आयातीमुळे देशातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन बाहेर जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे मोदी यांच्या वक्तव्यातून दिसून आले. इंधन दरवाढ आणि संभाव्य आर्थिक परिणामांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*