LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*सोनम वांगचूक रुग्णालयात; पत्नी गीतांजलींची औषधांबाबत स्पष्ट भूमिका*

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नी गीतांजली वांगचूक यांनी उपचारांबाबत महत्त्वाची भूमिका मांडत, आपल्या परवानगीशिवाय कोणतेही औषध तोंडावाटे किंवा शिरेवाटे देऊ नये, अशी मागणी केली आहे.

गीतांजली वांगचूक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट करत म्हटले की, "माझी, कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या वैद्यकीय सल्लागारांच्या संमतीशिवाय सोनम यांना कोणतेही औषध देण्यात येऊ नये." सध्या त्या स्वतः सफदरजंग रुग्णालयात उपस्थित असून वांगचूक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहेत.

माहितीनुसार, उपोषणाच्या 21व्या दिवशी सोनम वांगचूक यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर शनिवारी त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या शिफारशी आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उपोषणस्थळी उपस्थित आंदोलकांनीही आक्रमक भूमिका घेतली असून, सोनम वांगचूक यांच्यानंतर अभिजीत दीपके यांनी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*