LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका*

सरकारच्या कारवाईला Telegram चे आव्हान; तात्पुरत्या बंदीमुळे पेपरफुटी रोखण्याचा प्रशासनाचा दावा

नवी दिल्ली : NEET फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने Telegram अ‍ॅपवर घातलेल्या तात्पुरत्या निर्बंधांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात Telegram कडून दिल्ली न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, यावर सुनावणी होणार आहे.

आगामी २१ जून रोजी होणाऱ्या NEET फेरपरीक्षेपूर्वी पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने Telegram वर तात्पुरती कारवाई केल्याचे सांगितले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे परीक्षेतील संभाव्य गैरप्रकार रोखण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र Telegram ने हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

Telegram च्या वतीने प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात मांडण्यात आले असून, न्यायालयाने याचिकेवर सुनावणीस परवानगी दिली आहे.
दरम्यान, Telegram चे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. केवळ एका प्लॅटफॉर्मवर तात्पुरती बंदी घातल्याने समस्या पूर्णपणे सुटणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पेपरफुटीसारख्या घटना इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही होऊ शकतात, असा दावा Telegram कडून करण्यात आला आहे.

आता दिल्ली न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*